नाशिक: चांदवड जवळ एसटी बसचा भीषण अपघात २ ठार

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत एसटी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच मनमाड आगाराच्या बसला नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळ भीषण अपघात झाला आहे.

चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती. तिकडून परतत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला.

समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाला. अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

हि माहिती मिळताच चांदवड चे पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या बस मध्ये एकुण १३ प्रवाशी प्रवास करीत होते.