Home » नाशिक जिल्ह्याचं टेंशन पुन्हा वाढलं, आरोग्य यंत्रणा सतर्क

नाशिक जिल्ह्याचं टेंशन पुन्हा वाढलं, आरोग्य यंत्रणा सतर्क

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

जिल्‍ह्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सौम्‍य गतीने पुन्‍हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४७ रुग्ण पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा (Nashik District Health Department) सतर्क झाली आहे.

कोरोना महामारीच्‍या पहिल्‍या व दुसऱ्या लाटेत नाशिक महापालिका (Nashik NMC) क्षेत्राला मोठा फटका बसला होता. मात्र, काही कालावधीपासून ग्रामीण भागात प्रादुर्भाव (Nashik Rural area) वाढत असताना, तुलनेत शहरात घट झाली होती. ग्रामीण क्षेत्रातही निफाड (Niphad), सिन्नर (Sinnar), येवला (Yeola) या तालुक्‍यांमध्ये आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहत होती. मात्र, आता जिल्ह्यातील संख्या कमी होत असतांना शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.

दरम्यान नाशिक मनपा हद्दीत सर्वाधिक ३४ रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट (Nashik Administration) झाले आहे. रुग्ण संख्या सध्या कमी असली तरी रुग्ण वाढीत सातत्य राहिल्यास धोका वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सर्वानी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याच्चे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तर महत्वाचे म्हणजे जगभरात दहशत पसरविणारा ओमायक्रोन (Omicron) जिल्ह्याच्या वेशीवर धडकला आहे. सुदैवाने नाशिक जिल्ह्यात अद्याप शिरकाव नसल्याने नागरिक निर्धास्त आहेत. मात्र काळजी घेणे महत्वाचे असून कोरोनाची त्रिसूत्री पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!