राज्यातील 21 संघटनांच्या पाठिंब्यासह ST कर्मचाऱ्यांचे आज पासून बेमुदत उपोषण! पहा काय आहे मागण्या

ST कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे तर नाशिकमधील विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे नाशिकच्या ND पटेल रोडवरील ST डेपोत या कर्मचाऱ्यांनी एकत्र जमत पाठिंबा दर्शविला.

28 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा.वार्षिक वेतनवाढ ही 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात यावी ..दिवाळीपूर्वी वेतन मिळावे अशी या संघटनांची मागणी असून राज्यातील 21 संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.

सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे..दरम्या राज्यातील ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप करू असा इशारा नाशकात इंटकचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिलंय।।।