नाशकात चोरटे सुसाट! थेट विभागीय आयुक्तांनाच दाखवला हिसका

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याच बंगल्यात थेट चोरट्यांनी प्रवेश करत चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.दिवसेंदिवस नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे.


नाशिकमध्ये चोरांच्या मनात पोलिसांचा धाकच राहिला नाही की काय ? याचा प्रत्येय विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दालनातच चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याच्या घटनेवरून समोर आले आहे.मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत ही चोरीची घटना समोर आली आहे.चांडक सर्कल या वर्दळीच्या भागात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच शासकीय निवासस्थान आहे.

रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी विभागीय आयुक्तांच्या शासकीय बंगल्यात प्रवेश करून बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले आहे.कडेकोट बंदोबस्त असलेल्या या बंगल्यात चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

यापूर्वीही पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याही शासकीय ब आवारात चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. मात्र,अद्यापपर्यंत या प्रकरणातील कोणतेही चोर अद्याप पर्यंत हाती लागले नाही. त्यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर चैन स्नॅचिंग,जबरी चोरी,अश्या घटना दिवसागणिक घडत आहे.

2 लाखांची चोरी ताजी असतानाच थेट विभागीय आयुक्तांच्या दालनात चंदनाच्या झाडाची चोरी केल्याची घटना समोर आल्याने नाशिक पोलीस करताहेत तरी काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे