देवेंद्र फडवणीसांची राज्य सरकार वर खोचक टीका!

महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे तर भ्रष्टाचार करत आहेत. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये होते. यावेळी सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, ‘राज्याने गेल्या दीड वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या.

वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळं राज्याचं आतोनात नुकसान झालं. याची झळ मुख्यतः राज्यातल्या शेतकऱ्याला बसली आहे. या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसेही व्यवस्थित दिले गेले नाही. हे सरकार लबाड आहे. काहीही झालं की केंद्राला जबाबदर धरतं’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.