नाशिक – बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेतून पैसे काढून जात असलेल्या महिलेकडील चोरट्यांनी हिसकावली दोन लाखाची रोख रक्कम

दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी शालिमार येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेतून पैसे काढून घराच्या दिशेने जाणाऱ्या महिलेच्या हातातून रोख रक्कम दोन लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून नेली आहे,भर वस्तीतचा भाग म्हनून देखील या भागाची ओळख आहे… या चोरीच्या घटने प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

शिवाजी रोड शालिमार या भागात राहणारे रेहेना रफिक शेख आणि त्यांचे पती रफिक सुलेमान शेख यांनी आपल्या मुलाला वाहन घेऊन देण्यासाठी आणि घर खर्चासाठी शालिमार नेहरू गार्डन जवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 2 लाखांची रक्कम काढली होती.

दुपारी 1 ते दीड वाजेच्या दरम्यान ते ही रक्कम काढून घराच्या दिशेने जात असताना त्यांवर पाळत ठेवकेल्या दोघा चोरट्यांनी मागून दुचाकीवरून येऊन रेहेना शेख यांच्या हातातून रोख रक्कम 2 लाख ठेवलेली बॅग हिसकावून नेत शालिमार च्या दिशेने पोबारा केला,रेहेना शेख व पती यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र हे चोरटे दुचाकीवर असल्याने त्यांना पकडणं शक्य झाले नसल्याचे घटनेतील पीडितांनाकडून सांगण्यात आलेय.

दिवसेंदिवस शहरात चोरी,मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊन,चोरट्यांचा मनात पोलिसांचा धाक राहायला नाही की काय असाच प्रश्न आजच्या भर वस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेकडे बघितल्यावर येत आहे.

त्यामुळे हेल्मेट सक्ती सोबतच शहरात घडणाऱ्या चोरी,चैन स्नॅचिंग यांसह आदी गुन्ह्यांना आळा कसा बसेल याकडे देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे.तेव्हा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अश्या वाढत्या घटनाना आळा बसण्यासाठी वेळीच योग्य ती पाऊले उचलावी व धार्मिक महत्व असलेल्या मंदिरांच्या शहराची ओळख ही वाढत्या गुन्हेगारच शहर म्हणून नको व्हायला एवढीच अपेक्षा सर्वसमान्य करत आहे..