लवकरच नाशिकमध्ये देखील IT कंपन्या आणण्याच्या प्रयत्नात महापौर सतीश कुलकर्णी

नाशिक: येत्या नोव्हेंबर महिन्यात देशातील IT कंपनीच्या संचालकांचे घेण्यात येणार सेमिनार.

नाशिकमध्ये देखील IT कंपन्या याव्या आणि शहराच्या विकासात मोठा हातभार लावावा या उद्देशाने महापौर सतीश कुलकर्णी यांच्या वतीने गेल्या काही काळापासून प्रयत्न केले जात आहे त्यातच मागे झालेल्या महासभेत देखील याविषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे महापौर यांनी सांगितले आहे.

त्यातच येत्या नोव्हेंबर महिन्यात देशातील विविध it कंपनीच्या संचालकांसोबत नाशिकमध्ये सेमिनार घेण्यात येणार असून महापालिकेमार्फत नाशिकमध्ये 10 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे तर आणखी जागा आरक्षित करून त्या संबंधी जमीन मालकांशी चर्चा देखील केली जाईल व या IT कंपन्यांना लागणारे वीज,पाणी,इन्फ्रास्ट्रक्चर देखील महापालिका देईल अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.