Home » अबब.. ! चक्क पाच वर्षाच्या अरणाने केला मलंगगड सर.. !

अबब.. ! चक्क पाच वर्षाच्या अरणाने केला मलंगगड सर.. !

by नाशिक तक
0 comment

नाशिक जिल्ह्यातील मलंगगड सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक नाशिकची अरणा इप्परची आपण आता बातमी पाहुयात

दृश्यांमध्ये दिसणारी ही अरणा इप्पर… वयाच्या पाचव्या वर्षी तिने इतिहास रचलाय… मलंग गड तिने सर केलाय… विशेष म्हणजे त्यात रॅपलिंग आणि पोलक्रॉसिंग केलंय… भल्या – भल्यांची अशा साहसी ठिकाणी हिम्मत होत नाही अशा ठिकाणी अरणाने अगदी सहजतेने टप्पा पार केलाय.

तसे तिचे हे ट्रेकिंग तिसरे आहे… वयाच्या पाचव्या वर्षी तिने मलंग गड सर करणे काही साधी बाब नाहीये. कमी वयात तिने केलेला हा धाडसी ट्रेक अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे.

जेव्हा अरणा मलंग गड सर करत होती त्यावेळेस नेमक काय घडले ते देखील तिच्या वडिलांनी सांगितलं.

अरणा तशी घरात खोडकर आहेच, पण मुलीचा हा साहस पाहून कुटुंबाला आनंद झालाय. अरणाने मलंग गड सर केल्याने सर्वाधिक आनंद तिच्या आईला झालाय.

दरम्यान अरणाने केलेल्या ट्रेकिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. कमी वयात इतका मोठा गड सर करणे सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे भविष्यात अरणा आणखी नवनवे ट्रेकिंग करून विक्रम करणार यात शंकत नाही.

बायलाईन – नाशिक तक डिजिटल टीम

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!