नाशिक – तब्बल पाच किलो चांदीचे मुकुट घेऊन पसार झालेल्यांच्या आवळल्या मुसक्या!

नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एक पाच किलो चांदीचा मुकुट तसेच काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल जप्त केले आहेत.

हे मोबाईल वेगवेगळ्या घरफोडी मधील आहेत..या दोन आरोपींबरोबर इतर ही काही आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांना आहे.त्यानुसार भद्रकाली पोलीस तपास करत आहेत.