पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते…शफावत खान यांना वि.वा.शिरवाडकर नाट्य लेखन पुरस्कार तर दिलीप प्रभावळकर यांना प्रा.वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रदान…

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

दिलीप प्रभावळकर यांना प्रा.वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार, शफाहत खान यांना वि.वा शिरवाडकर नाट्यलेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला..यावेळी पूरस्काराच स्वरूप होत. रोख 25 हजार रुपये,स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर रवींद्र ढवळे यांना नटश्रेष्ठ बाबुराव नाट्यकर्मी पुरस्कार रोख 11 हजार रुपये,स्मृतिचिन्ह,आणि सन्मानपत्रासह प्रदान करण्यात आला. यावेळी वि.वा शिरवाडकर पुरस्काराचे मानकरी शफाहत खान यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या नाटका बाबत नाराजी व्यक्त केली.

प्लेग आला तेव्हा आता कोविड मध्ये राजकारण्यांच्या सभा चालू इतर कार्यक्रम पन चालू,मात्र नाटकावर घाव..नाटक बंद..कारण नाटकाला व्यवस्था घाबरते.. अस त्यांनी स्पष्ठ केलं..तर मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना आमचे मुख्यमंत्री सुद्धा नाट्यप्रेमी आहेत.

माणसाला सर्व हवं असत.काही येऊ द्या.. टीव्ही,मोबाईल.. पण नाटकाला लोक गर्दी करणार म्हणजे करणारच नाटकामुळे विरंगुळा,आनंद मिळतो..तसेच मदतीची जी तुम्हाला अपेक्षा आहे..ती नक्कीच आम्ही करू अस भुजबळ यांनी आश्वासन दिलं..