दिवाळीत फटाके फोडताय सावधान… ! लहान मुलाच्या जीवावर बेतलं.

दिवाळीत फटाके फोडताय सावधान… ! लहान मुलांना सांभाळा, इंदिरानगर परिसरात फटाके फोडण मुलाच्या जीवावर बेतलं

नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे या 7 वर्षाच्या मुलाला फटाके फोडण महागात पडलंय.

मित्रा सोबत फटाके फोडत असताना अचानक मित्राने एक फटाका पेटवून बाजूला फेकला मात्र तो शौर्यच्या अंगावर पडल्याने लगेच त्याच्या कपड्यानी पेट घेतला.यात तो मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सर्व परिस्थिती बघता शौर्यची आई योगिता यांनी फटाक्यांवर बंदी आणण्याची मागणी केलीये