न्यूझीलंडच्या एजाज पटेलची कमाल,

मुंबई । प्रतिनिधी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुंबईत होत असलेला दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक ठरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला असून त्याने ४७ षटकांत दहा विकेटस घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये सुरु आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही.

एजाजने एक एक करत दहा गडी तंबूत पाठवले. एजाज पटेलने अनिल कुंबलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. एजाज पटेलने ४७.५ षटकं टाकत १० गडी बाद केले. यात त्याने १२ षटकं निर्धाव टाकली. तर २.४९ च्या सरासरीने ११९ धावा दिल्या. अनिल कुंबलेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये १० गडी बाद केले होते.