कुसुमाग्रजनगरीत शरद पवारांची पुस्तक खरेदी अन बग्गीतून प्रवास

नाशिक | प्रतिनिधी

लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडत आहे.

या संमेलनाचा समारोप खासदार शरद पवार यांच्या हस्ते होत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज कुसुमाग्रजनगरीला भेट देत पाहणी केली.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, नंदकुमार डागा, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस संमेलन स्थळी खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या विविध पुस्तकांच्या स्टॉल ला भेट दिली.

यावेळेस वेगवेगळ्या स्टॉल धारकांनी पवार यांना पुस्तके भेट स्वरूपात दिलेत. तसेच चित्रदालन, बालकवी कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा व मुख्य सभामंडप परिसराची पाहणी केली.