सुनेकडून ‘या’ माजी मंत्री विरोधात गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी

माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे त्यांच्यात सुनेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्यांच्या सुनेने दिली आहे.

या प्रकरणी पिचड यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.