सिन्नरजवळ पुन्हा बसवर दगडफेक; गुन्हा दाखल

सिन्नर | प्रतिनिधी
येथील आगारातून तब्बल २५ दिवसांनी शनिवारी (दि. ४) चार मार्गावर एसटी बसेस धावल्या. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, दुपारी २ वाजता पाडळी फाटा ते काकड पेट्रोलपंपादरम्यान अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली.

याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सिन्नर-ठाणगाव या बसवर (क्र. एमएच १४, बीटी ३५९९) पाडळी फाटा ते काकड पेट्रोलपंपा दरम्यान दगडफेक झाली.

यात बसची पुढील भागातील काच फुटली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस करत आहे.