गुलाबी थंडीत नाशिकची राजकीय हवा मात्र तापली..!

नाशिक | प्रतिनिधी –
एकीकडे दोन तीन दिवसापासून गुलाबी थंडीने नाशिककर कुडकुडत असतांना साहित्य संमेलन आणि राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत असून त्यातच साहित्य संमेलनाने बहर आणला आहे. आज साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी शरद पवार उपस्थित असून उद्यापासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असल्याने नाशिकचे वातावरण चांगलेच तापणार आहे.

दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश होणार असून आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. तरच मनसे भाजप युती बाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याने महापालिका निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.