नाशिकच्या जवानाने साकारली परमवीरचक्र प्राप्त योद्ध्यांची भिंत

नाशिक । प्रतिनिधी

कारगिल युद्धादरम्यान टायगर हिल येथे आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यात प्राणाची बाजी लावणारे ग्रेनेडियर कॅप्टन योगेंद्र सिंह यादव हे आज देवळालीत येत असून येथील कारगिल योद्धा नायक दीपचंद यांची ते भेट घेत १९९९ सालच्या कारगिल युद्धाच्या प्रसंगाचे स्मरण करणार आहे.    

येथील लॅमरोडवरील नक्षत्रमध्ये राहणारे कारगील योद्धा नायक दीपचंद यांनी आपल्या घरात तब्बल देशातील २१ परमवीर चक्र प्राप्त योद्ध्यांचे फोटो घरात लावत ‘ पीव्हीसी वॉल ‘(परमवीर चक्रप्राप्त योद्ध्यांची भिंत ) साकारली आहे. या वॉलवर मेजर सोमनाथ शर्मा, नायक जादूनाथ सिंह, सेकंड लेफ्टिनेंट रामा राघोबा राणे, कंपनी हवलदार मेजर पीरू सिंह, लान्स नायक करम सिंह, कैप्टन गुरबचन सिंह सलारिया,सूबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमीद.

लेफ्टनंट कर्नल आर्देशीर तारापूर, लान्स नायक अल्बर्ट एक्का,फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखोने, सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, मेजर होशियार सिंह दहिया, नायक सूबेदार बाना सिंह, मेजर रामास्वामी परमेश्वरण, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, राइफलमैन संजय कुमार, कैप्टन विक्रम बत्रा यांसह कॅप्टन ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांचे फोटो या भिंतीवर लावण्यात आले आहेत.

आपल्या दैनिक कामकाजात त्या २१ परमवीर चक्र प्राप्त योद्धयांच्या फोटोंची नियमित स्वच्छता करत असतात. यापैकी एक असलेले ग्रेनेडियर कॅप्टन योगेंद्र सिंह यादव हे उद्या रविवार दि. ३० रोजी देवळालीत दाखल होत असून या वॉलची पाहणी देखील करणार आहे.