शनिवार, जून 3, 2023
घरक्राइम'त्या' फेसबुक लाईव्ह प्रकरणी जीतेंद्र भावे यांना अटक

‘त्या’ फेसबुक लाईव्ह प्रकरणी जीतेंद्र भावे यांना अटक

नाशिक | प्रतिनिधी

आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी भावे यांनी एका फेसबुक लाईव्ह दरम्यान, मनपा शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागावर सडकून टीका केली होती. या आक्षेपार्ह वक्तव्या वरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी आज त्यांना नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र भावे हे आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असून ते आपल्या फेसबुक लाईव्ह मधून नेहमी विविध प्रश्नांवर ताशेरे ओढत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अनेक समस्या मांडल्या होत्या.

राजीव गांधी भवन येथे त्यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले होते. यात महिला शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभाग याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप