शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमपंचवटीतील हिरावाडी परिसरात युवकांवर प्राणघातक हल्ला

पंचवटीतील हिरावाडी परिसरात युवकांवर प्राणघातक हल्ला

नाशिक | प्रतिनिधी

शहर व परिसरात टवाळखोरांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी टोळक्यांचे हल्ले मात्र सुरूच असून गुरुवारी रात्री पंचवटीतील हिरावाडी परिसरात दोन युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.

हिरावाडी परिसरात दोन युवक उभे असतांना काही जण त्या ठिकाणी आले. यावेळी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.

यात या दोघांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला करीत जखमी केले. यातील एकजण गंभीर जखमी असून दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप