बिबट्याचे हल्ले सुरूच; ठार केलेला कुत्रा नेण्यासाठी बिबट्या पुन्हा आला!

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रे ठार झाले असून ही घटनी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संदीप वसंतराव भालेराव यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा ठार झाला.

तिसगाव येथील भालेराव परिवार दिवसभर शेतातील काम आवरुन रात्री जेवन करुन झोपी गेले असता शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास संदीप भालेराव ह्यांना कुत्र्याच्या साखळीचा आवाज आला. त्यांनी खिडकी उघडुन बघितले तर बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे दिसुन आले. पण यावेळी आवाज झाल्याने बिबट्याने धुम ठोकली पण थोड्यावेळाने ठार केलेला कुत्रा ओढुन नेण्यासाठी बिबट्या पुन्हा आला.

https://www.youtube.com/watch?v=abxLtP6KgFU

तिसगाव व परिसरात बिबट्याचा वावर काही दिवसांपासुन दिसुन येत आहे .रात्री शेतात कांदे,द्राक्षबांगा पाणी देण्याचे काम सुरु असते, यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने पिंजरा लावुन देखील बिबट्या मात्र अजुनपर्यंत पकडण्यात यश आले नाही. पिंजरे वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.