नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून विधान परिषद सभापतींनी दिले आयुक्तांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला (MHADA) वर्ग करण्याचा नियम आहे. महापालिकेने (NMC) त्याचे उल्लंघन केले. यासंदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली. त्याची विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Minbalkar) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश दिले.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वरून आयुक्तांवर आरोप केला होता. आर्थिक दुर्बल घटकातील २० टक्के घर म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे ही बदली झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता असून सात हजार सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याचे प्रकरण भोवले असल्याचे बोलले जात आहे. तर आयुक्तांच्या चौकशीसह बदलीच्या आदेशानंतर खळबळ उडाली आहे.