शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्याआता हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नाशिक पोलिसांचा नवा फंडा

आता हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नाशिक पोलिसांचा नवा फंडा

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी हेल्मेट सक्तीविषयी धडक मोहीम सुरु आहेत. मात्र प्रत्येकवेळी नवा आदेश काढण्यात येऊन हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यावर भर दिला जात आहे. मात्र आता यापुढे विना हेल्मेट आढळल्यास वाहन जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

नाशिक शहरात अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र दुचाकीधारकांकडून हेल्मेट वापरण्याचे टाळले जात असल्याने बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. याच पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरात मंगळवार दि. १८ पासून ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विनाहेल्मेट दुसऱ्यांदा आढळल्यास तर त्या वाहनधारकांचा थेट परवाना रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीची मोहीम जोर धरू लागली आहे. सुरवातीला वाहनधारकांनी नियमित हेल्मेट परिधान करावे यासाठी पोलिसांच्या वतीने ‘ नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करत ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ याद्वारे विनाहेल्मेट वाहनधारकांना शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयात देखील प्रवेश नाकारण्यात आला.

हेल्मेट वाहनधारकांचा टक्का वाढविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली आहे. हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांविरोधात मंगळवारपासून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास वाहनधारकास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढल्यास १००० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी त्या वाहनधारकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे. अचानकपणे वाहनधारकांची तपासणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप