असामान्य माणसं घडविणारा ‘राजा’ पडद्यावर मांडणार : स्वागताध्यक्ष भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले, डॉ.बाबसाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरषांना मदत केली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे माणसांमधील कर्तृत्व ओळखून त्याच्या कर्तृत्वाला चाल देवून असामान्य माणसं घडविणारा राजा होता. या राजाचे कार्य नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले आहे.

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या 50 ग्रथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आहे. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदयाचे कुलपती राजमाता शुभांगीनींराजे गायकवाड , दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत उपस्थित होते. समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, माजी आमदार पंकज भुजबळ, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे समन्वय प्रा.हरी नरके, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विश्वास ठाकूर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे, ही अतिशय

आनंदाची व अभिमानाची बा‍ब असून या समितीने 50 पुस्तकांचे प्रकाशन करुन षटकार मारला आहे. तसेच महाराज सयाजीराव गायकवाडांचे जन्मस्थळ नाशिक असून आज त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन जन्मभूमीत व मराठी साहित्य संमेलनात होत असल्याने आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करुन महात्मा फुलेंचे सर्व विचार राज्यकर्ता म्हणून अमलांत आणणारा पहिला राजा होता. तसेच लेखणी लिहीणाऱ्याच्या विचारसरणीवर अवलंबून असून पूर्वी बहूजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात नव्हता. आता बहूजन समाज शिकला असून ते ही आता आपल्या बहूजन समाजाचे साहित्य संपदा जगासमोर आणून ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे, असेही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.