संमेलन समारोपासाठी शरद पवार नाशकात दाखल

नाशिक | प्रतिनिधी

मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांचे आज नाशिक येथे आगमन झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले.

मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या संपन्न होत असून उद्या (दि.०५) या संमेलनाचा समारोपाचा दिवस आहे.

या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पवार हे आज नाशकात दाखल झाले आहेत.