महाराष्ट्रात पहिला ओमायक्रोनचा रुग्ण सापडला

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील २३ वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.

त्यामध्ये हा तरुण ओमिक्रॉनने बाधित असल्याचं आढळून आले आहे. त्याच्यासोबतच्या २५ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे.

दरम्यान हा तरूण ०४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली मध्ये दाखल झाला होता. दक्षिण अफ्रिकेहून दुबईमार्गे दिल्ली आणि त्यानंतर हा प्रवासी डोंबिवलीमध्ये दाखल झाला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविले होते. मात्र, आता त्याला लागण झालेला विषाणू हा ओमिक्रॉन असल्याचं स्पष्ट झाले आहे. त्याच्यासोबत असलेले २५ प्रवाशी कोरोना निगेटीव्ह आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या ३५ जणांना ट्रेस करण्यात आले. मात्र, त्यांचीही चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे या तरुणाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार कितपत झाला आहे, याचा शोध यंत्रणा घेत आहे.