महाविकास आघाडीतला वाद चव्हाट्यावर !

पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे,गेल्या वर्षीचा नियोजन समितीचा निधी कामासाठी वर्ग करू नये अशी मागणी सुहास कांदे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी संदर्भात मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने हा निधी कुठल्याही कामासाठी वर्ग करू नये अशी मागणी आमदार कांदे यांनी केली आहे.

दरम्यान येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निधी कामांसाठी वर्ग झाला तर मी आत्मदहन करेन असा इशारा देखील आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे.या मागणी वरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमधील वाद पेटणार तर आहेच शिवाय महाविकास आघाडितला हा वाद चवाठ्यावर येण्याची देखील शक्यता आहे.

दरम्यान कांदे यांच्या मागणी बद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता कांदे यांचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले आहे,ते यावर योग्य ते निर्णय घेतील असे म्हणत भुजबळ यांनी या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली…

कांदे यांच्या मागणीनुसार हा निधी वर्ग केला नाही तर इतरही आमदारांचे नुकसान होईल अशी भीती देखील यावेळी भुजबळांनी व्यक्त केली आहे….