इंदोरीकर महाराजांनी लस का घेतली नाही ?

नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केलय.

एकीकडे सरकार लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच दुसरीकडे भर कीर्तनात मी कोरोनाची लस आतपर्यंत घेतली नाही आणि घेणार पण नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

कोरोनावर एकच उपाय आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवणे अस मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले….लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते आणि या कीर्तनाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।।।