पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी..

नाशिकच्या सातपूर भागात एका चार वर्षाच्या मुलावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला असून या हल्ल्यात किसन धर्मेंद्रसिंह हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.त्यामुळे सातपूर येथे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सातपूरच्या गोरक्षनाथ मंदिराजवळ काल सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

किसन धर्मेंद्र सिंग हा घराच्या बाहेर खेळत असताना अचानक एका कुत्र्याने या चार वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करत त्याला चावा घेतला.बेसावध असतांना काही कळण्याच्या आत या पिसाळलेल्या कुत्र्याने या चार वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याच्या शरीराच्या विविध भागावर चावा घेत त्याला गंभीर जखगामी केले,या चिमुरड्याचा आवाज ऐकून त्याच्या घरच्यांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत या चिमुरड्याला पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवले.

या घटनेत कुत्र्याने हल्ला केलेल्या किसानच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून,किसन च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे,सध्या त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्नालय येथे उपचार सुरु आहे…तर सदर परिसरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त लावला अशी मागणी जखमी किसनचे वडील यांनी केली आहे.