Home » नाशिक महानगरपालिकेत लवकरच मेगा भरती, महापौरांचे संकेत

नाशिक महानगरपालिकेत लवकरच मेगा भरती, महापौरांचे संकेत

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

महानगरपालिका आस्थापना परिशिष्ठावरील विविध रिक्त पदांवर नोकरभरती करण्यात यावी. यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून रिक्त पदाअभावी कामकाज करण्यास अडचणी येत असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले आहे कि, नाशिक महानगरपालिका ७ नोव्हेंबर १९८२ रोजी अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत शहराची लोकसंख्या २२ ते २४ लाखांच्या घरात गेलेली आहे. नाशिक महापालिकेच्या आस्थापन परिशिष्ठावर असलेल्या विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने प्रत्येक महिन्यात सरासरी ३० ते ४० कार्यरत कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे आधिकारीं व कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमीं होत आहे.

अनेक अधिकाऱ्यांकडे चार पाच विभागांचा कार्यभार आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण वाढत आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याकारणाने बरेचसे अधिकारी व कर्मचारी यांना विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. कामकाजाच्या तणावामुळे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. शहराची वाढती लोकसंख्या महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणात वाढत असलेली कामाची व्याप्ती, आगामी सिहंस्थ कुंभमेळा, नागरिकांना द्यावा लागत असलेल्या सेवा सुविधा, रस्ते, पथदीप, पाणी, वैद्यकीय, आरोग्य स्वच्छता, भुयारी गटार योजनेसह इतर सुविधा द्याव्या लागतात.

अशा सुविधांच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. आणि वयंपाक कामांमुळे त्या त्या भागांवर मनुष्यबळाची म्हणजेच अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. सुमारे २४ वर्षांपासून महानगर पालिकेत कोणत्याही पदाची आवश्यकतेइतकी नोकर भरती झाली नसून नागरी सेवा सुविधांमध्ये नियमित वाढ होतच असल्याने उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हि सर्व कामे अतिरिक्त कार्यभार देऊन आजमितीस करून लागत आहेत. त्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीला तात्काळ मान्यता मिळावी अशी विनंती महापौरांनी या पत्रातून केली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!