मी माय झाले, तुम्ही या अनाथांचे बाप व्हा !

नाशिक । प्रतिनिधी
‘मला माय बनता आलं, म्हणून मी माय झाले, या अनाथ मुलांचे तुम्हीच बाप बना, त्यांना भक्कम आर्थिक पाठबळ द्या, असे आवाहन सिंधुताईंनी नाशिककरांना करीत त्यांच्यातील अनाथांचे मायचे कर्तव्य बजावले होते.

अनाथांची माई म्हणून भारतभर ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. सोशल मीडियावर अनेकजण माईंना आदरांजली वाहत होते. अनेकांनी माईबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नाशिकमधील नागरिकांनी आपल्या भावना प्रकट केल्या.

नाशिकच्या सामाजिक संस्था, संघटनांनी सिंधुताईंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सिंधुताईंनी उपस्थित नागरिकांना अनाथ बालकांसाठी मदतीची हाक दिली होती. नाशिकच्या पसा नाट्यगृहात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी काढलेल्या भावनाविवश उदगारांनी नाशिककर हेलावले होते. ‘मी अनाथांची माय झाले, तरी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण नाही करू शकत, त्यामुळे तुमच्यातील प्रत्येक दानशूराने पुढे होऊन समाजातील या दुर्लक्षित घटकांसाठी उदारपणा दाखविण्याचे आवाहन केले होते. ‘मला माय बनता आले, म्हणून मी माय झाले, कोणत्याही लेकरांना आर्थिक पाठबळ देणारा बाप देखील हवा असतो, ते कर्तव्य तुम्ही पार पॅड, असे आवाहन सिंधुताई यांनी केले होते.

तर नाशिकचे पालकमंत्री यांच्या माईच्या निधनानंतर श्रद्धांजली व्यक्त केली आहे. ते म्हणाले कि, ‘अतिशय संघर्षाच्या अशा परिस्थितीत त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ गेला. त्यांच्या निधनाने अनाथनाचा आधारवड हरपला असून एका संघर्ष पर्वाचा अंत झाला असल्याची भवन त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देखील सिंधुताई यांच्या सोबतच्या आठवणी जाग्या केल्या.