मंत्री आदित्य ठाकरे ‘त्या’ महाकाय वृक्षाला भेट देणार

नाशिक | प्रतिनिधी

महाकाय वृक्षाला वाचविण्यासाठी नाशिककर एक झाले, आंदोलने झाली, दोन हजाराहून हरकती नोंदविण्यात आल्या. या प्रकरणाची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली. आणि मनपा प्रशासनाला आराखडा बदलण्याची सूचना केली. याच पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरे हे उद्या नाशिकमध्ये पोहचणार असून या दौऱ्यात ते उंटवाडीतील महाकाय वटवृक्षाला भेट देऊन वृक्षाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर गंगापूर धरणावरील बोट क्लबला भेट देतील.

तसेच दुपारी खरशेतच्या शेंद्रीपाडा व सावरपाडा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्याची पर्यटन आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

त्यानंतर नाशिक विभागाची माझी वसुंधरा अभियानातंर्गत आढावा बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.