Home » कळवण नगरपंचायतमध्ये मनसेचा प्रवेश, चेतन मैंद ठरले जायंट किलर

कळवण नगरपंचायतमध्ये मनसेचा प्रवेश, चेतन मैंद ठरले जायंट किलर

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
नुकत्याच जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपने सर्वाधिक मते मिळवून आपले कमळ फुलवले आहे. मात्र विशेष म्हणजे मनसेने एक जागेवर विजय मिळवून अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कळवण नगरपंचायतच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेच्या एका उमेदवाराने धक्कादायक विजय मिळवला आहे.

कळवण नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्का दिला आहे. एकूण १७ जागेंपैकी राष्ट्रवादी ०९, भाजप ०२, काँग्रेस ०३, शिवसेना ०२ असा निकाल लागला आहे. मात्र यात मनसेच्या एका उमेदवाराने विजय मिळवूंन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.


प्रभाग क्रमांक ०८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन मैंद यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुनील महाजन यांचा धक्कादायक पराभव केला. महाजन हे ह्याच प्रभागाच्या नगरसेविका अनिता महाजन यांचे पती तर कमको बँकेचे चेअरमन, कृऊबा चे संचालक, कळवण एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त आहेत. तर चेतन मैंद या कुठलाही राजकीय पूर्वानुभव नसलेल्या नवख्या युवा उमेदवाराने महाजन यांचा केलेला पराभव कळवण शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

प्रभाग 8 मध्ये मनसेचे चेतन मैंद यांनी २८४ मते मिळवून राष्ट्रवादी पुरस्कृत कमको अध्यक्ष सुनील महाजन यांचा पराभव केला त्यांना २५६ मते मिळाली तर भाजपाच्या डॉ अनिल महाजन यांना १३ मते मिळाली. या विजयाने मनसेने नगरपंचायतमध्ये प्रवेश केला आहे. मात्र कळवणकरांनी नगरपंचायतची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार यांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!