नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाची ‘मुंबई चलो’ची हाक

नाशिक । प्रतिनिधी

मराठा समाजाच्या प्रमुख सहा मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारी २०२२ रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मुंबई येथे अन्नत्याग आमरण उपोषण करणार आहेत.तर नाशिकमधून देखील मोठ्या संख्येन मराठा समाज बांधव हे या उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे..

खासदार संभाजीराजे भोसले हे शिवजयंतीनिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. आणि मुंबईच्या आजाद मैदान येथे आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. या पार्याश्सावभूमीवर नाशिकमधील मराठा क्रांती मो र्चा समन्वय समितीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधून देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी गेत्लेल्या पत्रकार परिषदेत खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले होते कि, सरकारला जर हे उपोषण नको असेल तर छत्रपती संभाजी महाराज यांनी सरकारला दिलेल्या पत्रकातील प्रमुख सहा मागण्यांवर येत्या दोन दिवसात मार्ग काढावा, न्याय प्रविष्ट मराठा आरक्षण असून त्या व्यतिरिक्त, सारथी शिक्षण संस्था,अण्णा साहेब महामंडळ, वसतिगृह, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे सवलत मिळावी, कोपर्डीच्या केसला वकील देणे आदी प्रमुख मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला राज्यभरातुन पाठिंबा मिळत असून अनेक संघटना मुंबईला रवाना होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाचे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या माध्यमातून त्यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला पाठींबा देत मुंबईत हजर राहणार असल्याचे सांगितले.