Home » शासनाला चंदन लावणारा ‘पुष्पा’ पोलिसांच्या ताब्यात

शासनाला चंदन लावणारा ‘पुष्पा’ पोलिसांच्या ताब्यात

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

परीक्षेत्राचे पाेलिस उपमहानिरीक्षक व तुरुंग अधिक्षकांच्या बंगल्यात घुसून थेट चंदनाची झाडे ताेडून नेणाऱ्या सराईताला नाशिक गुन्हेशाखेच्या युनिट एकने जालन्यातून पकडले आहे. जावेद खान अजीज खान पठाण असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या सराईताला पकडून आणतांना त्याच्या नातलगांसह नागरिकांनी त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करुन पाेलिस कारवाईला विराेध करत गाेंधळ घातल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला हाेता. मात्र, पथकाने जीव धाेक्यात घालून त्याला ताब्यात घेत नाशिकला आणले आहे.

दरम्यान युनिट एकचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना नाशिकमध्ये चंदनचाेरी करणारे चाेरटे जालन्यातील कठाेरा बाजार भागात वास्तव्यास असल्याची माहिती कळाली हाेती. त्यानुसार पथक नियाेजनानुसार जालन्यासाठी रवाना करण्यात आले हाेते व या संशयिताला पकडण्यात पथकाला यश मिळाले आहे. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षा भेदून चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरून नेली हाेती.

यानंतर चार दिवसांनी चोरट्यांनी परिक्षेत्राचे पाेलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गडकरी चौकातील गोदावरी बंगल्याच्या आवारातून १२ हजार रुपयांचे चंदनाचे झाड तोडून चोरून नेले. या बंगल्यावरील सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड चोरून नेल्याचे समोर आले हाेते. तर सातपूर येथील शासकीय आयटीआय जवळील पोस्ट कार्यालयाच्या आवारातूनही चोरट्याने चंदनाचे झाड चोरून नेले हाेते.

त्या त्या पाेलिस ठाण्यांकडून तपास सुरु असताना युनिट एककडून समांतर तपास सुरु असताना त्यांना चंदनचाेर जालन्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कठाेरा बाजार भागात सापळा रचुन जावेदखान या संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!