Home » चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

चारा घोटाळ्याच्या (Fodder Scam) सर्वात मोठ्या प्रकरणात (RJD) चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्यावर ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

चारा गैरव्यवहारातील सर्वांत मोठ्या डोरंडा कोशागार गैरव्यवहारात लालू प्रसाद यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी जाहीर केले होते. झारखंडमधील डोरंडा कोषागरातून १९९६मध्ये १३९.३५ कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

चारा घोटाळ्याच्या या मोठ्या प्रकरणात लालू यादव यांच्याशिवाय इतर ३७ दोषींनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी सीबीआय कोर्टात (CBI) दोरांडा चारा घोटाळा प्रकरणातील दोषींना हजर होण्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. त्याचवेळी, उर्वरित दोषींना होतवार कारागृहात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पशूखाद्य गैरव्यवहारात चाईबासा कोशागारसंबंधी दोन, देवघर व डुमका कोशागारशी संबंधित चार प्रकरणात लालू प्रसाद यांना १४ वर्षांची शिक्षा आधीच सुनावण्यात आलेली आहे. यादव हे सध्या एम्स रुग्णालयात आहेत.

काय आहे प्रकरण?

दोरंडा ट्रेझरी प्रकरण हे प्रसिद्ध चारा घोटाळा प्रकरणांपैकी एक आहे. १९९० दरम्यान, अधिकारी आणि नेत्यांनी बनावट ६७ बनावट वाटप पत्रांच्या आधारे चाईबासा कोषागारातून ३३.६७ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढले. याप्रकरणी १९९६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १० महिलाही आरोपी आहेत. या प्रकरणात चार राजकारणी, दोन वरिष्ठ अधिकारी, चार अधिकारी, सहा लेखा कार्यालय, ३१ पशुसंवर्धन अधिकारी स्तरावर आणि ५३ पुरवठादारांना आरोपी करण्यात आले आहे. आता या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह ९९ आरोपी आहेत, ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!