नाशिक । प्रतिनिधी
भाजपमध्ये अनेक लोक क्रित्येक वर्षावापासून काम करीत आहेत. मात्र असे काम करताना पदाची लालसा न ठेवता काम करणे आवश्यक असते. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळते. शिवाय भाजपचे तिकीट मिळणे म्हणजे विजय आपलाच असतो, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी आयोजितर भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आगामी नाशिक मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ताकद, त्यामुळे नेत्यानो कार्यकर्त्यांना डावलू नका. त्यामुळे नेत्यानो नातेवाईकांचा विचार करण्याऐवजी पहिल्यांदा कार्यकर्त्याचा विचार करा, आणि कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे, भाजपचे तिकीट मिळणे म्हणजे निवडून येणारच , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर नाशिक मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची अजेंडा असेल, याबाबत ते म्हणाले कि, नाशिक मानपावर भाजपचे कमळ फुलल्यापासून अनेक विकास कामे नाशिक शहरात झाल्याचे पाहायला मिळते. नुकतीच शहरातील नागरिकांना सिटी लिंकच्या माध्यमातून चांगली बससेवा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच शहरात निओ मेट्रो प्रस्तावित आहे. येत्या काळात नमामि गोदा, निर्मल नाशिक, आयटी हब, समृद्धी हायवे या साठी प्रयत्नशील आहे. मागील दोन वर्षाच्या संघर्षमय काळात नाशिक मनपाने कोरोनातून वाचविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
तर महाविकास आघाडीवर बोलताना ते म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व दिसत नाही, मुंबई पलीकडे महाराष्ट्र आहे, हे सरकारला माहित नाही.. या तिघांना माहिती आहे, भाजपाला थोपवण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. त्यामुळे आपल्याला मनपा निवडणुकित पूर्ण ताकदीने, एकसंघपणे उतरावे लागणार आहे. मात्र भाजपचे राजकारण हे रिअलिस्टिक व केमेस्ट्री वर चालते.. मावळे लढाईच्या वेळी कमी असायचे, पण मुघलांवर भारी असायचे, त्यांच्याकडे शिवरायांसारखे नेतृत्व होते. त्याचप्रमाणे आपल्या पाठीमागे मोदीसारखे नेतृत्व आहे, आहे त्यामुळे जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.