मोठी बातमी! मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंद

मुंबई । प्रतिनिधी
कोरोना आणि ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार असल्याची माहिती मुंबई मनपा आयुक्त चहल यांनी दिली आहे.

एकीकडे ओमायक्रोनची धास्ती वाढली असताना दुसरीकडे मात्र कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या चा फटका बसता कामा नये यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये पूर्वीप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे.

तर यावेळी मनपा आयुक्त चहल म्हणाले कि, मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या शाळांना पुन्हा बंद करावे लागत आहे. कारण मुंबईत कोरोना चा प्रसार वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. तर इयत्ता ते बारावीचे विद्यार्थी मात्र लसीकरणासाठी शाळेत उपस्थित राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईमधील कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता वाढल्याने आता पुन्हा एकदा प्रशासनाने खबदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच सुरु झालेल्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा कधी सुरू होतील याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.