Home » हिरावाडीत पेंटरचा दगडाने ठेचून खून, संशयितांचा शोध सुरु

हिरावाडीत पेंटरचा दगडाने ठेचून खून, संशयितांचा शोध सुरु

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

हिरावाडी रोडवरील दामोदर नांगर परिसरात मनपाच्या उद्यानाजवळ एका ४५ वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील त्र्यंबक कराटे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेंटरचे काम करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हिरावाडी रोडवर असलेल्या दामोदर नागरसमोर मनपा उद्यानाजवळ मोकळ्या पटांगणात बुधवारी दुपारच्या सुमाराला व्यक्तीची संशयितांनी दगडी गट्टूने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिकांना दुपारच्या सुमारास उद्यानालगत मयत इसम दिसल्याने याबाबत पोलिसानं माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली असता , मृतदेहाच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखम आढळून आल्या. तर अंगावरही अनेक ठिकाणी जखमी केल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत या व्यक्तीबाबत माहिती घेतली. तर सदरचा मृतदेह पेंटरचे काम करणाऱ्या सुनील कराटे याचा असून तो हिरावाडीत राहत असल्याची माहिती मिळाली. पेंटींगचे काम करण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर गेलेला सुनील घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय काळजीत होते. मात्र दुपारच्या सुमारास त्याचा खून झाल्याचे समजतात कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान सुनील याचा खून का व कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस संशयितांचा शोध घेत असून दारुच्या वादातून हि घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!