…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, पालकमंत्री भुजबळ यांचे संकेत

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढतो आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कठोर निर्बंध लावण्यात येतील असे संकेत पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अद्यापही नागरिक निर्धास्त होत फिरताना दिसून येत आहेत. यावर आवर घालणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर राखून नागरिकांनी वावरणे आवश्यक असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दिवसांत निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तर पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत कालच्या घटनेवर ते म्हणाले की, कालच्या घटनेबाबत दोन बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचे आहे. अचानक पंतप्रधान यांचा मार्ग बदलण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. असे असले तरी पंतप्रधान यांच्या दौऱ्याबबत काळजी घेणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवर उत्तर देतांना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हिमतीवर आमच्या पेक्षा जास्त आमदार निवडणून आलेत, चंद्रकांत पाटील देखील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडणून येतात ते मोदी च्या पुण्याईवर त्यामुळे राजकारणात स्वकर्तुत्व महत्वाचे असते.

तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तरी ते असे का बोलले हे मला माहीत नाही, मात्र ओबीसी आरक्षणासाठी देखील अनेकांनी योगदान दिले आहे, हे ही तितकेच खरे आहे. आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार ओबीसी समाज रस्त्यावर उतरून लढत नाही ते समजून घ्यावे, असे खोचक विधान त्यांनी यावेळी केले.