नाशिकमधील ‘या’ नेत्यांना कोरोनाची लागण

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढतच असून आता नाशिकमधील नेतेही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.

दिंडोरीच्या खासदार तथा आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोहोंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे राज्यातील ७० च्या आसपास आमदार आणि १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर आता नाशिकमधील नेते पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांत ५०८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत.