नाशिक | प्रतिनिधी
इगतपुरी जवळील मुंढेगाव येथील भीषण अपघातात तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन शिक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधान कंटेनर रस्त्यावर उलटला. यावेळी तो कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवरती जाऊन धडकल्याने हा दुर्दैवी प्रसंग त्या शिक्षकांवरती ओढावला आहे.
या अपघातात दोन प्राथमिक शिक्षक तर एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर ३ शिक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान यातील जखमी शिक्षिकाना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका। भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. प्रसंगी स्थानिक रुग्णमित्र गुंड यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.