Video : नमामि गोदा भूमिपूजन झाले, मात्र या प्रकल्पाचा अहवालच तयार नाही!

नाशिक । प्रतिनिधी

आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नमामी गोदा आणि क्लस्टर प्रकल्प बाबत पुन्हा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून घाईगडबडीत उदघाटन करण्यात आलेल्या नमामी गोदा आणि क्लस्टर या कार्यक्रमांचे प्रोजेक्ट रिपोर्टच तयार असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी रामकुंडावर कपिल पाटील यांच्या उपस्थितीत नमामि गोदा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर नाशिक पोलिसानी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल केले होते. या कार्यक्रमासंदर्भात शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी नवा खुलासा केला आहे. अजय बोरस्ते यांनी सांगितले कि, नमामि गोदा प्रकल्पाचा अहवालच तयार नाही, हा कार्यक्रम केवळ राजकीय स्टंट आहे. तसेच महापौर मुदत संपणार होती, यामुळे महापौरांनी घाई घाईत कार्यक्रम उरकले गेले आहेत.

तर या कार्यक्रमासंदर्भात आयुक्त म्हणाले कि होते कि, ही काम कोट्यवधींची असून कमी कालावधीत काम दर्जेदार होणं शक्य नाही. तर विरोधकांनी देखील महापौर यांच्या घाई घाईत उरकलेल्या कामांच्या उदघाटन सोहळ्यावर टीका करत पाच वर्षात भाजपने नाशिकमध्ये काहीही ठोस काम केली नाही. निवडणूक जवळ आल्याने हा भाजपचा एक चुनावी जुमला असून, या प्रोजेक्ट ला प्रशासकीय मान्यता नसून हे सर्व संशयास्पद असल्याचे सांगत जोरदार टीका केली.

पाच वर्षात आपण काहीही करू शकले नसून केवळ निवडणूका समोर ठेऊन हा भाजपचा केविलवाणा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी केला आहे..एकूणच सर्व पाहता माजी महापौर यांनी उदघाटन केलेल्या कार्यक्रमाला जर प्रशासकीय मान्यताच नव्हती, तर त्यांनी हा कार्यक्रम घेतला तरी कसा? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.