शिवसेना नेते नुसत्या घोषणा देतात, दम नाही त्यांच्यात!

नाशिक | प्रतिनिधी
नाशकात मी येणार म्हणून विरोध करण्यात आला, मात्र,एकही शिवसैनिक काही समोर येत नाही, त्यामुळे नुसतं विरोध करू नका, विकासाला विरोध नको, अशा वृत्तींमुळे महाराष्ट्र मागे पडत असल्याची टीका मंत्री नारायण राणे केली आहे.

नाशिक शहरात आयटी पार्क तयार करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री नारायण राणे यांना नाशकात होते. नाशिकमधील आयटी कंपन्यांसोबत आजच्या चर्चासत्रात ते बोलत होते.

ते यावेळी म्हणाले की, नाशिक एक उद्योगशील शहर आहे, त्यामुळे कुणीही आठकाठी न आणता हा प्रकल्प होणे आवश्यक आहे. या प्रकल्पाबरोबरच इतर प्रकल्प राबवता येतील. भिवंडीत पाचशे एकर मध्ये औद्योगिक परिसर परवानगी मागितली आहे, नाशिकचा प्रस्ताव द्या, इथेही देतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, मी येणार म्हणून नाशिक कमिशनर पळून गेले. खरं तर त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले. कोकणातील नाणार भागातील सर्व जमिनी शिवसेना नेत्यांच्या आहेत. अणुऊर्जा प्रकल्पात ते जमिनी देतील आणि पैसे कमावतील. मी उभा राहिलो आणि मोजणी करून घेतली. शिवसेना नेते नुसत्या घोषणा देतात, काही दम नाही यांच्यात, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.