Home » रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

by नाशिक तक
0 comment

नवी दिल्ली | प्रतिनिधी

रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यात सुरु असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला (Indian Student) आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घडली आहे. युक्रेनमध्ये मृत्यू झालेला विद्यार्थी मूळचा कर्नाटक (Karnataka) येथील असून नवीन असे या युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रशिया युक्रेन वाद इरेला पेटला असून यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच युक्रेनमधील (Ukraine) भारतीय विद्यार्थी जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला निघाले होते, तेव्हा युक्रेनच्या पश्चिम सीमेवर ही घटना घडली.

या घटनेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती ट्विटरवर दिली आहे. अरिंदम यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, हे कळविण्यास आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे की, युक्रेन येथील खारकीव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्रागण गमवावे लागले. मंत्रालय मृत विद्यार्थ्याच्या संपर्कात आहेत.

दरम्यान या घटनेनंतर परराष्ट्र सचिवांलयाकडून रशिया आणि युक्रेनच्या राजकीय दुतावासासोबत चर्चा करण्यात आली आृहे. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी दोन्ही दुतावासांना करण्यात आली आहे.

खारकीव आणि इतर शहरांमध्ये अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारच्या वतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!