ब्रम्हकुमारी संस्थेने तब्बल ११०८ नारळापासून साकारले शिवलिंग

नाशिक | प्रतिनिधी

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबक नगरी भाविक भक्तांनी फुलून गेली होती. यात आकर्षण होत ते म्हणजे नारळपासून बनवलेले शिवलिंग होय. त्र्यंबक राजाच्या दर्शनाबरोबर भाविकांनी या शिवलिंगाचेही दर्शन घेत हर हर महादेव चा जयघोष केला.

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्र्यंबकमध्ये महाशिवरात्री निमित्त त्र्यंबक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. यावेळी आंबेडकर चौक येथे म्हणजेच त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वार जवळ भव्य नारळापासून बनवलेले शिवलिंग बसविण्यात आले होते.

दरम्यान ब्रम्हकुमारी या संस्थेच्या त्र्यंबकेश्वर शाखेने नारळापासून हे शिवलिंग साकारण्यात आले असून तब्बल ११०८ नारळ यासाठी वापरण्यात आले आहेत. तर पंधरा ते सोळा शिवभक्तांनी मेहनत करून सात दिवसात हे शिवलिंग साकारल्याची माहिती ब्रम्हकुमारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

काळात बंद असलेले मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाले आहे. त्र्यंबकेश्वरब (Trimbakeshwar) मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून बम बम भोले, हर हर महादेव घोषणांनी परिसर दुमदुमला होता. महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले होते.