थर्टी फस्ट घरातच साजरी करा, कारण नाशिक पोलिसांची तुमच्यावर नजर !

नाशिक । प्रतिनिधी

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककरांना घराबाहेर न पडता, घरीच राहून साध्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.नाशिक पोलिसांनियाबाबत आदेश जारी केले आजच्या थर्टी फास्टवर नाशिक पोलीस लक्ष ठेवून आहे. त्यामुळे घराबाहेर न पडता घरातच नवं वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

कोरोना आणि ओमायक्रोनचा वाढता संसर्ग बघता शासनांकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तांनी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार नववर्ष सेलिब्रेशन वर बंदी राहणार आहे. नववर्षांचे स्वागत घरातच करावे लागणार आहे. शहरात रात्री ९ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

३१ च्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून कडक तपासणीसह नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात कोणीही घराबाहेर पडून सावर्जनिक ठिकाणी गर्दी करता काम नये. त्याचबरॊबर कोरोना नियमांचे पालन आवश्यक असून नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरीच नववर्षांचे स्वागत करा अन कारवाई टाळा असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केले आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रिसॉर्ट, हॉटेल आणि अन्य ठिकाणी नववर्ष पार्ट्याना बंदी घालण्यात आली असून विनापरवानगी पार्टी आयोजित करणाऱ्यांवर कारवाई केली जाणारआहे. यासाठी विशेष पथक तैनात केल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, मास्कचा वापर अनिवार्य राहिल आदी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.