मंत्री बच्चू कडूंबाबत पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

नाशिक । प्रतिनिधी
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २२ डिसेंबर ला नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्या प्रकरणी कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात बच्चू कडू हे २२ डिसेंबर ला नाशिक कोर्टात हजेरी लावणार आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू आज नाशिक शहरात होते. यावेळी त्यांनी नाशिक कोर्टात हजेरी लावली. २०१७ ला नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी अपंगांचा तीन टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना निधी खर्च का झाला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू अपंगांच्या शिष्टमंडळा सह पालिकेत आले होते.

याबाबत वादविवाद झाले होते, त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आली होती.