नाशिककर सावधान ! आता चोरट्यांची नजर तुमच्या मुलांवर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मात्र आता या चोरट्यानी लहान मुलांना लक्ष केले आहे. अशीच एक घटना शहरातील सिडको भागात समोर आली आहे.

शहरातील सिडको भागात राहणाऱ्या पगारे यांची लहान मुलगी अंगणात खेळत असताना अज्ञात व्यक्ती तिथं आला. त्याने मुलीला आपल्या जवळ बोलावून तिच्या गळ्यातील सोन्याच लॉकेट हिसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने त्याला विरोध केल्याने त्याने थेट मुलीच्या हातावर कट्यारने वार करत पळ काढला.. मात्र या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून आता चोरटे लहान मुलांना लक्ष करत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.