नाशिक । प्रतिनिधी
अंगारकी चतुर्थीनिमित्त गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे खुली झाल्यानंतर पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
अंगारकी चतुर्दशी म्हटलं कि गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे आज साकळपासूनच शहरातील नवश्या गणपतीसह इतर गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी होती. मंदिर परिसरात फुल हार, अगरबत्ती, नारळ तसेच पेढे विक्रेत्यांची रेलचेल दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर परिसरात मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
नवश्या गणपती सह, रविवार कारंजा गरणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.