सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूक करून महिलेवर अत्याचार..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : शहरातील मुंबईनाका परिसरात एका पुरुषाने पहिले लग्न झालेले असताना देखील फेसबुकच्या (facebook) माध्यमातून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तसेच आपला पहिला विवाह झाल्याचे या महिलेपासून लपवून ठेवले. सदर पुरुषाने वेळोवेळी त्या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) बलात्कार तसेच फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्या महिलेसोबत जवळीक साधून, आपले पहिले लग्न झाल्याचे त्या महिलेपासून लपवून ठेवले. तसेच आपला कायदेशीर घटस्फोट झाला आहे, असे फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांना भासवून दिले. या नातेवाईकांच्या संमतीने, संशयित आरोपीच्या आई-वडिलांनी संगनमताने आरोपीचे फिर्यादी महिलेसोबत लग्न लावून, त्या महिलेची फसवणूक केली. तसेच संशयित आरोपीने फिर्यादी महिला ही आपली कायदेशीर पत्नी नसल्याचे माहित असताना देखील, शारीरिक संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी महिलेवर बलात्कार केला. तसेच फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला.

याप्रकरणी सशयित आरोपी तसेच त्याचे आई-वडील (रा. फ्लॅट (flat) नं. ५, स्नेह संकुल सोसायटी, भाऊसाहेब हिरेनगर, नाशिक-पुना रोड) या तिघांवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) बाळू पोपटराव गिते (Balu Popatrao Gite) या घटनेचा अधिक तपास करत आहे.